Wednesday, August 12, 2026
Homeसातारासुरवडी गणात वंचित बहुजन आघाडीचे रणजित मोहितेंचा भावनिक प्रचार दौरा;‘ही लढाई सत्तेसाठी...

सुरवडी गणात वंचित बहुजन आघाडीचे रणजित मोहितेंचा भावनिक प्रचार दौरा;‘ही लढाई सत्तेसाठी नाही, तर माणसाच्या सन्मानासाठी’

फलटण : सुरवडी गणात वंचित बहुजन आघाडीचे रणजित मोहितेंचा भावनिक प्रचार दौरा; ‘ही लढाई सत्तेसाठी नाही, तर माणसाच्या सन्मानासाठी’
निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे पंचायत समिती सुरवडी गण येथील उमेदवार रणजित मोहिते यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रभावी आणि भावनिक प्रचार दौरा केला. घराघरांत जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधत स्वतःची ओळख करून दिली तसेच वंचित बहुजन आघाडीचे विचार आणि पक्षाचे चिन्ह मतदारांसमोर मांडले.
या प्रचार दौऱ्यात रणजित मोहिते यांनी सर्व कष्टकरी, शोषित, वंचित, गरीब आणि सामान्य घटकांचे प्रश्न हाच आपल्या लढ्याचा केंद्रबिंदू असल्याचे ठामपणे सांगितले. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत “सत्तेच्या खुर्चीसाठी नव्हे, तर माणसाच्या सन्मानासाठी ही निवडणूक लढवली जात आहे,” असा भावनिक संदेश देत त्यांनी मतदारांच्या मनाला हात घातला.
या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. घोषणाबाजी, जनसंवाद आणि संघटनेची ताकद या माध्यमातून परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. नागरिकांनीही उमेदवाराला भरभरून प्रतिसाद देत आपल्या अपेक्षा मांडल्या.
सुरवडी गणात सामाजिक न्याय, समानता आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी रणजित मोहितेंचा प्रचार दौरा चर्चेचा विषय ठरत असून, वंचित बहुजन आघाडीची उपस्थिती अधिक ठळक होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments