अकलूज | लेझीमच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात विजय चौक परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. सहकार महर्षी शंकरराव (काकासाहेब) नारायणराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त, संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘२० व्या भव्य लेझीम स्पर्धा २०२६’ चे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री. संग्रामसिंह मोहिते-पाटील, नूतन नगरसेवक श्री. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील तसेच रेश्मा अडगले यांच्या हस्ते करण्यात आले.
अकलूजची लेझीम ही केवळ परंपरा नसून जागतिक ओळख ठरली आहे. आदरणीय श्री. जयसिंह (बाळदादा) मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजच्या लेझीमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत इतिहास घडवला आहे. हा गौरवशाली वारसा पुढे नेणाऱ्या सर्व सहभागी शाळा, संघ व वादक कलाकारांचे यावेळी विशेष कौतुक करून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, अकलूज नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये आदरणीय श्री. विजयसिंह (मोठेदादा) मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पॅनलला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळाच्या वतीने सर्व नूतन नगरसेवक-नगरसेविका व नगराध्यक्षा रेश्मा अडगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले अकलूजचे ग्रामस्थ सहभागी झाले होते. लेझीमच्या तालावर साजरा झालेला हा सोहळा अत्यंत चैतन्यमय आणि प्रेरणादायी ठरला.
लेझीमच्या तालावर अकलूजचा विजयोत्सव! विजय चौकात २० व्या भव्य लेझीम स्पर्धा २०२६चे दिमाखदार उद्घाटन
RELATED ARTICLES
