पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: धार्मिक ग्रंथांतील शिकवणी‎ आणि संकेतांना जीवनाशी जोडा‎

0
48
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  धार्मिक ग्रंथांतील शिकवणी‎ आणि संकेतांना जीवनाशी जोडा‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, Relate Teachings And Indications From Religious Texts To Life

6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपल्या जीवनात काही पुस्तके असली पाहिजेत. कोणताही गोंधळ किंवा‎विचलितता येते तेव्हा या ग्रंथांना वाचावे. मग ते गीता, महाभारत,‎रामचरितमानस, भागवत, बायबल, कुराण किंवा इतर कोणताही ग्रंथ‎असो. त्यामध्ये दिलेले संकेत ओळीदरम्यान शोधले पाहिजे. अशा ग्रंथांचे‎वाचन करण्याचा अर्थ म्हणजे त्याचा भावार्थ जाणून ताे जीवनाशी जोडणे.‎आजच्या पिढीला काही गोष्टी आजच्या उदाहरणांवरूनच समजतात.‎आपल्या देशातील सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष धक्कादायक निर्णय घेतो‎तेव्हा लोकांना ते खूप आश्चर्यकारक वाटते. परंतु त्यांच्या भूतकाळातील‎राजकारण्यांनी काही सखोल अर्थ असलेले ग्रंथ लिहिले आहेत. आज‎घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा वेध त्या पुस्तकांमध्ये दिसताे. म्हणून हा एक‎धडा घेतला पाहिजे. काही उंची गाठायची असेल तर धर्मग्रंथ वाचावा.‎तुम्हाला उंचीवर राहायचे असेल तर त्या ग्रंथांमध्ये दिलेल्या शिकवणी‎आणि संकेतांना सतत जीवनाशी जोडा. भले दररोज एक पान वाचले तरी‎चालेल. पण जरुर वाचन करावे.‎



Source link