१ ऑगस्टपर्यंत वाढीव सन्मानरक्कम न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

0
4
१ ऑगस्टपर्यंत वाढीव सन्मानरक्कम न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई : राज्य शासनाच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत शासनाने मंजूर केलेली वाढीव सन्माननिधीची रक्कम अद्याप लाभार्थी पत्रकारांना अदा झालेली नाही. त्यामुळे ही वाढीव रक्कम (दरमहा रुपये ९ हजार) व एप्रिल २०२४ ते जुलै २०२५ पर्यंतचा फरक (रु. १ लाख ४४ हजार) १ ऑगस्ट २०२५ पर्यंत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्यावतीने देण्यात आला आहे.

सदर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असून, यामध्ये संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ (वय ८२) व त्यांच्या सहकाऱ्यांकडून उपोषणाची तयारी दर्शवण्यात आली आहे. ही माहिती पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके व संपादक संघाचे प्रशासकीय संचालक अमर शेंडे यांनी दिली.