चायना मांजामुळे पक्षी तसेच माणसांच्या जीवितास धोका; फलटणमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन

0
3
चायना मांजामुळे पक्षी तसेच माणसांच्या जीवितास धोका; फलटणमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन

फलटण (साहस Times) :चायना मांजामुळे दरवर्षी अनेक पक्षांचे व नागरिकांचे प्राण जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, फलटण शहरात जनजागृतीचा महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. नेचर अँड वाइल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या वतीने चायना मांजाविरोधात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी वनविभाग फलटण, फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण नगरपरिषद यांचे सहकार्य लाभले आहे.

ही रॅली रविवार, दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता, मुदोजी हायस्कूल फलटण येथून सुरू होणार आहे. चायना मांजाच्या वापरामुळे होणारे पर्यावरणीय आणि मानवी हानी लक्षात घेता नागरिकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थेने केले आहे.

या जनजागृती अभियानामधून चायना मांजावर बंदी आणण्याबाबत जागरूकता वाढवून पक्षीमित्र व पर्यावरणप्रेमी नागरिकांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.