Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्र"कुरिअर बॉय"चा बहाणा करून बलात्कार! पुण्यातील संगणक अभियंता तरुणीवरील अत्याचार प्रकरणात जुना...

“कुरिअर बॉय”चा बहाणा करून बलात्कार! पुण्यातील संगणक अभियंता तरुणीवरील अत्याचार प्रकरणात जुना मित्र आरोपी अटकेत

पुणे: कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या २५ वर्षीय संगणक अभियंता तरुणीवर घरात घुसून बलात्कार केल्याची संतापजनक घटना बुधवारी (दि. २ जुलै) सायंकाळी घडली. या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल दहा पथकं कामाला लावली होती. अखेर पोलिसांना मोठे यश मिळाले असून, संबंधित आरोपीला पुण्यातूनच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पीडित तरुणी व आरोपी एकमेकांचे जुने मित्र असल्याचे उघड झाले आहे.

पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ती कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत कार्यरत आहे आणि दोन वर्षांपासून कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ बाहेरगावी गेला असताना ती एकटीच घरी होती.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने कुरिअर बॉय असल्याचा बहाणा करत दरवाज्यावर टकटक केली. पीडितेने कुरिअर नाकारल्यावर आरोपीने “स्वाक्षरी लागेल” असे सांगून तिला सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून, ती दृष्टिहीन झाल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला.

त्याने पीडितेचे मोबाईलवर फोटो काढले आणि “मी पुन्हा येईन” असा मेसेज मोबाईलवर लिहून तीव्र मानसिक धक्का दिला.

घाबरलेल्या पीडितेने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीचा माग काढला आणि अखेर त्याला पुण्यात अटक करण्यात आली.

या प्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, घरात अनधिकृत प्रवेश आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments