Friday, August 21, 2026
Homeसाताराफलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. निखील मोरे साहेब यांनी केले संविधान दिंडीचे...

फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. निखील मोरे साहेब यांनी केले संविधान दिंडीचे स्वागत

फलटण, २८ जून – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही संविधान दिंडीचे आगमन फलटण शहरात मोठ्या उत्साहात झाले. संविधानाच्या प्रचार-प्रसारासाठी आणि संविधानातील मूल्ये व अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. निखीलजी मोरे साहेब यांनी फलटणकर नागरिकांच्या वतीने संविधान दिंडीचे स्वागत केले. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना गुलाब पुष्प व पुष्पहार अर्पण करून सन्मानित केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधानप्रेमी मोठ्या संख्येने जमले होते. सामाजिक कार्यकर्ते हरिश काकडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले.

कार्यक्रमास जेष्ठ नेते मा. विजय येवले, संजय निकाळजे, गंधवार्ता संपादक रोहित अहिवळे, राजू मारुडा, महादेव गायकवाड, सिद्धार्थ उर्फ विकी काकडे, पत्रकार सुशील गायकवाड (तरडगाव), शिवा अहिवळे, निलेशभाऊ मोरे, ॲड. विशाल मोहिते, सागर राजपाल अहिवळे, बंटी साबळे, महिला सामाजिक कार्यकर्त्या व अनेक संविधान प्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे सागर काकडे (आळजापूर) यांनी केले तर बार्टीचे अधिकारी मा. दिलीप वसावे सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments