Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रनिळकंठेश्वरचा एकतर्फी विजय, आता अजितदादांचा ‘आभार मेळावा’ होणार लक्षवेधी!

निळकंठेश्वरचा एकतर्फी विजय, आता अजितदादांचा ‘आभार मेळावा’ होणार लक्षवेधी!

माळेगाव | साहस Times :- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलने विरोधकांचा साफ पाडाव करत ऐतिहासिक यश मिळवलं आहे. २१ पैकी तब्बल २० जागांवर निळकंठेश्वर पॅनलने विजय मिळवला असून, ही निवडणूक राज्याच्या सहकार क्षेत्रात चर्चेची ठरली आहे.

या एकतर्फी विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दि. २८ जून रोजी माळेगावमध्ये कार्यकर्त्यांचे आणि सभासदांचे आभार मानण्यासाठी येत आहेत. दुपारी १.३० वाजता माळेगाव कारखान्याच्या कार्यस्थळी असलेल्या शिवतीर्थ मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.

अजितदादांच्या नेतृत्वावरील विश्वास दाखवत सभासदांनी विरोधकांना साफ झटपट उत्तर दिलं आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांनी “अजितदादांच्या व्यतिरिक्त एकही उमेदवार निवडून येणार नाही,” असा दावा केला होता, तर काहींनी त्यांच्यावर “सहकारी साखर कारखानदारी संपवण्यासाठी माळेगावमध्ये उतरत आहेत,” असे आरोपही केले होते. यावर अजित पवारांनी प्रचारसभांमधून सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं.

निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी सभासदांना आश्वासन दिलं होतं की, “आपण कारखान्याची सूत्रे घेतल्यानंतर कारखान्याचा कायापालट करून दाखवू आणि सलग पाच वर्षे राज्यात सर्वाधिक दर देऊ.”

या पार्श्वभूमीवर उद्याचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या सभेत अजितदादा केवळ कारखान्याच्या प्रगतीबद्दल बोलतील असे नाही, तर विरोधकांनाही जोरदार उत्तर देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments