Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनशिरूरची पाणीकपात पावसामुळे स्थगित

शिरूरची पाणीकपात पावसामुळे स्थगित

शिरूरची पाणीकपात पावसामुळे स्थगित

[ad_1]

शिरूर : शिरूर शहर आणि तालुक्यात संततधार असून, शिरूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करून दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात कुकडी कालवा वितरिकेतून सोडण्यात आलेले पाणी आणि परिसरात झालेला दमदार पाऊस यामुळे बंधारा भरला आहे. त्यामुळे शिरूर शहराला दिवसाआड करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा बंद करून नियमित दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पावसामुळे शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. मशागती, पेरण्या लांबल्या आहेत. काही शेतांत पाणी साचले असून, भाजीपालाही सडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments