Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशसौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी प्रवास करत असलेली बस भर समुद्रात उलटली,...

सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी प्रवास करत असलेली बस भर समुद्रात उलटली, अन् त्यानंतर….; कुटुंबीयही हादरले

सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी प्रवास करत असलेली बस भर समुद्रात उलटली, अन् त्यानंतर….; कुटुंबीयही हादरले

[ad_1]

भारतीय क्रिकेटर संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहशिश गांगुली आणि त्याची पत्नी अर्पिता थोडक्यात बचावले आहेत. दोघेही स्पीडबोटने प्रवास करत असताना ती समुद्रात पलटली. ओडिशामध्ये ही घटना घडली आहे. दोघेही ओडिशामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पोहोचले होते. बीचवर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी करत असतानाच त्यांची स्पीडबोट समुद्रात उलटली. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्पीडबोट समुद्रात पलटलेली दिसत असून, लाइफगार्ड त्यांना वाचवताना दिसत आहेत. अर्पिता गांगुलीने कमी प्रवासी असल्याने बोटीचं वजन कमी होतं, ज्यामुळे ती पलटली असा दावा केला आहे. 

“समुद्राला उधाण आलं होतं. बोटीमध्ये 10 लोकांची प्रवास करण्याची क्षमता आहे. मात्र पैशांसाठी त्यांनी फक्त तीन लोकांनाच बोटीत बसू दिलं. समुद्रात जाणारी त्या दिवसातील ती शेवटची बोट होती. आम्ही समुद्रात जाण्याआधी चिंता व्यक्त केली होती. पण ऑपरेटर्सनी आम्हाला सर्व काही ठीक आहे असं सांगितलं,” अशा खुलासा अर्पिता गांगुलीने केला आहे.

आम्ही समुद्रात जाताच एक मोठी लाट आमच्या बोटीला आदळली असंही तिने सांगितलं. ती म्हणाली की, “जर लाइफगार्ड आले तर, कदाचित आम्ही वाचणो शक्य नव्हतं. मी अद्यापही ट्रॉमात आहे. मी आयुष्यात कधीही अशा कोणत्या गोष्टीचा सामना केलेला नाही. जर बोटीत आणखी लोक असते तर ती पलटली नसती,” असं ती म्हणाली आहे.

अर्पिता गांगुलीने बोटी चालवणाऱ्या ऑपरेटर्सची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे. “अधिकाऱ्यांनी येथे या खेळांवर बंदी घालावी. पुरी समुद्रकिनाऱ्यावर खूप खवळलेला समुद्र आहे. मी कोलकात्याला परत गेल्यावर पोलिस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन आणि त्यांना येथे वॉटरस्पोर्टस बंद करण्यास सांगेन,” असं ती म्हणाली.

पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी ओडिशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. राष्ट्रीय हवामान अंदाज वर्तवणाऱ्याने या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी गंजम, गजपती, रायगडा, कालाहांडी, कंधमाल आणि कोरापूट जिल्ह्यात आणि बुधवारी पुरी, खुर्दह, गंजम, गजपती, रायगडा, कोरापूट आणि मलकानगिरी जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments