
[ad_1]
नाशिक – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंदूर मोहिमेतून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांकडून होणारे हल्ले थांबले असले तरी सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय शहर हद्द वगळून) तीन जूनपर्यंत ड्रोन उड्डाणास प्रतिबंध (नो ड्रोन फ्लाय झोन) केला आहे.
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमानुसार १६ मे ते तीन जून २०२५ या कालावधीत हे निर्बंध लागू केले आहेत. या आदेशान्वये महत्वाचे धार्मिक स्थळ, गर्दीची रेल्वे स्थानके, मॉल्स, औद्योगिक क्षेत्र या सर्व ठिकाणी ड्रोन, दूरसंवेदक नियंत्रित मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटरर्स, हँग ग्लायडर्स, गरम हवेचा बलून आणि तत्सम सर्व हवाई क्रियाकल्पांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
[ad_2]
Source link
