Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रइंदापूरमधील ‘छत्रपती’ कारखाना पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात

इंदापूरमधील ‘छत्रपती’ कारखाना पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात

इंदापूरमधील ‘छत्रपती’ कारखाना पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात

[ad_1]

बारामती : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘जय भवानी माता’ पॅनलच्या सर्व २१ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा एकदा अजित पवार यांंच्या ताब्यात राहिला आहे.

पवार यांच्याविरोधात भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने उभ्या केलेल्या ‘श्री छत्रपती बचाव’ पॅनलवर नामुष्कीची वेळ आली. अजित पवार यांंच्या ‘जय भवानी माता’ पॅनलच्या विरोधात भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कारखान्यासाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून अजित पवारांच्या ‘श्री जय भवानी माता’ पॅनलचे सर्व २१ उमेदवार आघाडीवर राहिले. मतदानाचा कल लक्षात घेता उपमुख्यमंत्री पवार यांचे पॅनल विजयी होण्याच्या मार्गावर होते. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. जिल्हा निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या कारखान्याच्या २२ हजार ६८१ मतदारांपैकी १६ हजारांहून अधिक मतदारांनी मतदान केले.

मतमोजणीत पहिल्या फेरीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील ‘जय भवानी माता पॅनल’ने आघाडी घेतली. ‘जय भवानी माता पॅनल’च्या वतीने पुढील सलग पाच वर्षे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज जाचक यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यांचा गट क्रमांक एक होता. या गटात जाचक यांनी मोठी आघाडी घेतली. सायंकाळी सहापैकी पाच गटांची मतमोजणी झाली. मतमोजणीचा कल लक्षात घेता सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शेतकरी कृती समितीला दिल्याचे दिसून आले.

हेही वाचा
हेही वाचा

कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, भाजपचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजी थोरात यांनी ‘श्री छत्रपती बचाव’ पॅनलच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले. या पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत होण्याच्या मार्गावर होते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments