Friday, August 21, 2026
Homeसातारापाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 30 लाखांचा अपहार; माजी सभापती उपसभापतीसह 21...

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 30 लाखांचा अपहार; माजी सभापती उपसभापतीसह 21 जणांवर गुन्हा

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 30 लाखांचा अपहार; माजी सभापती उपसभापतीसह 21 जणांवर गुन्हा

[ad_1]

सातारा: पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीस लाखांचा अपहार झाल्याची घटना (Patan Market Committee Scam) उघडकीस आली असून या प्रकरणी, माजी सभापती उपसभापतीसह 21 जणांवर या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारळे आणि माणगाव पेट्रोल पंप व्यवहारात अनियमितता असल्याने संबंधितांवर सुमारे 30 लाख रुपयांच्या अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात सचिव हरीश बंडू सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मल्हार पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाजार समिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ताब्यात

दरम्यान, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हा अपहार उघडकीस आल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पाटण तालुक्यातले राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तत्कालीन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या ताब्यात पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती असताना हा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या ही बाजार समिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाटणचे राजकारण तापणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

आमदार सचिन पाटील यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर

फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर दिला आहे. गेल्या 23 वर्षात फलटणला कधीही त्याचा हक्काचे पाणी मिळाले नाही. फक्त माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करणे आणि माझ्यावर टीका करतायत. मला डास, ढेकूण, काळा, नकटा अशी टीका केली. पण एक मच्छर काय करू शकतो हे नाना पाटेकर यांच्या चित्रपटात दाखवले आहे. मी काळा, नकटा असलो तरी शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्व सामन्यातून मला लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे हा काळा , नकटा माणूस शेतकऱ्यांच्या शेतात सोने पिकवणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचे पाणी मिळवून देणार आहे. नेहमी व्यक्ती दोष करत राहिला आहे. असं रामराजे यांना आमदार पाटील यांनी नाव न घेता उत्तर दिले आहे.

तलावात जनावर धुवायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने 15 वर्षीय मुलगा बुडाला  

गोंदियाच्या खमारी येथे तलावात जनावर धुवायला गेलेला एक 15 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विश्वा प्रधान (15) राहणार हलबीटोला असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव असून प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरू आहे.  विश्वा हा आपल्या घरचे जनावर धुवायला तलावात गेला होता.  दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला आहे. घटनेची माहिती प्रशासनाला मिळाली असून प्रशासनाकडून घटनास्थळी शोध सुरू आहे..

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments