Friday, August 21, 2026
Homeसातारामहात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य, नव्या वादाल

महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य, नव्या वादाल

महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य, नव्या वादाल

[ad_1]

Harshvardhan Sapkal : काँग्रेसचे (Congress) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी कराड येथील प्रीतिसंगमावर भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) हत्येवरून खळबळजनक विधान केले आहे. “महात्मा गांधींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा पक्ष आहे. या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं. काँग्रेसचे दोन पंतप्रधान शहीद झाले. पण काही लोकांना ना इतिहासाची जाणीव आहे, ना स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची. गांधी हत्येला विसरणं म्हणजे देशाच्या मूलभूत मूल्यांवरच घाला आहे. महात्मा गांधींची हत्या ही केवळ हत्या नव्हे, ती एक विचारधारेवर झालेली दहशतवादी कारवाई होती, असे त्यांनी म्हटले आहे. 

हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल 

काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या (BJP) वाटेवर असल्यानं काँग्रेस संपणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसचा आणि देशाचा डीएनए एक आहे. काँग्रेसचे विचार, धोरणे आणि परंपरा या लोकजीवनातून आल्या आहेत. देशात लोकशाही उभी करणारा, स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस पक्ष डुबणं कदापि शक्य नाही. टीका करणाऱ्यांना देशाचा इतिहास माहीत नाही, स्वातंत्र्य सैनिकांची किंमत नाही. दोन पंतप्रधानांचं बलिदान ते विसरत आहेत. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवाद होता, असं त्यांनी म्हटले आहे.  

भाजप पक्षच काँग्रेसयुक्त होत चाललाय 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचं, याचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आला आहे.’काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची दीर्घकालीन भूमिका राहिली असली, तरी त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की काँग्रेसमुक्त भारत कधीच शक्य नाही. उलट परिस्थिती अशी आहे की, भाजप पक्षच आता काँग्रेसयुक्त होत चालला आहे. काँग्रेसमधून अनेक नेते वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले असले, तरी काँग्रेस पक्ष संपलेला नाही आणि भविष्यातही संपणार नाही. काही नेते अडचणींमुळे पक्ष सोडत असतील, पण खरे काँग्रेस कार्यकर्ते मात्र आजही पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा

India-Pakistan War: अमेरिकेने भारत अन् पाकिस्तानमध्ये समझोता कसा घडवून आणला? मोदी अन् शरीफ यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतलं, 48 तासांत काय घडलं?

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments