Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशभारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? फायटर जेट क्रॅश? पाकिस्तानच्या 3 दाव्यात किती...

भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? फायटर जेट क्रॅश? पाकिस्तानच्या 3 दाव्यात किती सत्यता

भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? फायटर जेट क्रॅश? पाकिस्तानच्या 3 दाव्यात किती सत्यता

[ad_1]

PIB Fact Check: पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादाविरोधात मोठी मोहीम उघडलीय. सिंदूर ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळं भारताच्या टार्गेटवर आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या सीमेवर भ्याड हल्ले करण्यात येत असून भारतीय लष्कराकडून हे हल्ले परतवून लावण्यात येत आहेत. भारताकडून अशी हार मिळत असतानाच पाकिस्तानने खोट्या बातम्यांचा आधार घेतला आहे. भारतीय सीमेवर तणाव वाढवण्याबरोबरच पाकिस्तान सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवत आहे. त्यांच्याकडून काही दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात भारतीय फायटर जेट्स क्रॅश होण्याबरोबरच एक महिला पायलटला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येतं. तसंच, वायुसेनाचे फायटर जेट्स क्रॅश झाल्याचा मेसेजदेखील व्हायरल होतोय. मात्र भारत सरकारकडून अधिकृत फॅक्ट चेक एंजन्सी PIB Fact Check ने हे तिन्ही दावे पूर्णपणे खोटे असल्याचं म्हटलं आहे. 

भारत-पाकिस्तान तणावाची परिस्थिती असताना पीआयबी फॅक्ट चेकने पाकिस्तानने केलेले तीन दावे खोडून काढले आहेत. त्याचा पहिला दावा होता की, पाकिस्तानने भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्व्स्त केली आहे. सोशल मीडियावर असे अनेक पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र PIB Fact Check ने पूर्णपणे हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. एस-400 ला कोणतेही नुकसान झाले नसून ह दावा तथ्यहीन आणि आधारहिन आहे. 

दुसरा दावा हा आहे की, हिमालय क्षेत्रात भारतीय वायुसेनेचे तीन फायटर जेट्स क्रॅश झाल्याचाचा दावा केला जात होता. तसंच, एक फोटोदेखील व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो 2016 चा असून त्याचा आणि आत्ताच्या परिस्थितीचा काहीही संबंध नसल्याचे आढळले आहे. 

तिसरा दावा हा आहे की, भारतीय महिला एअरफोर्सची एक पायलट शिवानी सिंह यांना पाकने ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. पण यावरही PIB Fact Checkने स्पष्ट केलं आहे की हा दावा पूर्णपणे चुकीचा असून स्कॉड्रन लीडर शिवानी सिंह या सुरक्षित असून अशी कोणतीही घटना झाली नाहीये. हा दावा पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया अंकाउंट्सकडून पसरवण्यात येत असलेला प्रोपोगंडा आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments