Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रपत्राचाळीतील २३४३ घरांच्या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन

पत्राचाळीतील २३४३ घरांच्या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन

पत्राचाळीतील २३४३ घरांच्या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन

[ad_1]

मुंबई: गोरेगाव, पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध झालेल्या भूखंडापैकी चार भूखंडांवर मंडळाकडून २३४३ घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या बांधकामाचे कार्योदेशही कंपन्यांना देण्यात आले आहेत. आता या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.

रखडलेला पत्राचाळ पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पूर्ण करण्यात येत आहे. त्यानुसार पुनर्वसित आणि सोडतीतील घरांच्या इमारतींचे काम पूर्ण केल्यानंतर मंडळाने गृहनिर्मितीसाठी काही भूखंड उपलब्ध झाले असून त्यापैकी चार भूखंडांवर घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आर-१, आर-७, आर-४ आणि आर-१३ या भूखंडांवर मिळून एकूण २३४३ घरे बांधली जाणार आहेत. या घरांच्या बांधकामासाठी २०२४ मध्ये मंडळाने निविदा प्रक्रिया राबवली. निविदा अंतिम करून चार कंत्राटदारांना कार्यादेशही देण्यात आले. या गृहप्रकल्पात मध्यम गटासाठी सर्वाधिक १२४२ घरे बांधली जाणार आहेत. अल्प गटासाठी १०२३ आणि उच्च गटासाठी १३३ घरांची निर्मिती केली जाणार आहे. या घरांचे काम २०२८-२९ मध्ये पूर्ण करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे.

कार्योदेश जारी झाल्यानंतर भूखंड साफसफाईसह अन्य प्राथमिक कामे कंत्राटदारांकडून सुरु आहेत. मात्र अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली नसून थाटामाटात भूमिपूजन करून बांधकामास सुरुवात करण्याचा घाट म्हाडा प्राधिकरणाने घातला आहे. आपल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातही त्याचा समावेश केला आहे. मात्र अद्याप भुमिपूजन झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने भुमिपूजन रखडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र लवकरात लवकर भुमिपूजन करत बांधकामास सुरुवात करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यानुसार भुमिपूजनासाठी वेळ घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

कुठे किती घरे

आर १ भूखंड

● बांधकाम क्षेत्रफळ- ४८३८.१७ चौरस मीटर

● मध्यम गटासाठी ५०४ घरे (७६९ चौरस फूट)

● उच्च गटासाठी ६८ घरे (१०१७ चौरस फूट)

● एकूण ५७२ घरे

आर ७ भूखंड

● बांधकाम क्षेत्रफळ – ३१२७.७३ चौरस मीटर

● अल्प गटासाठी ३१६ घरे (४७९ चौरस फूट)

● मध्यम गटासाठी २६२ (८२८ चौरस फूट)

● एकूण – ५७८ घरेआर ४ भूखंड

● बांधकाम क्षेत्रफळ – ६०१९.५६ चौरस मीटर

● अल्प गटासाठी ७०७ घरे (४७३ चौरस फूट

)● मध्यम गटासाठी ३१८ घरे (७३१ चौरस फूट)

● एकूण १०२५ घरे

आर १३

● बांधकाम क्षेत्रफळ – २७६९.७८ चौरस मीटर

● मध्यम गटासाठी १५८ घरे (७४१ चौरस फूट)

● उच्च गटासाठी ६५ घरे (९९३ चौरस फूट)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments