Saturday, October 31, 2026
Homeसाताराशरद पवारांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी; संजीवराजेंचा राजीनामा, मेळाव्याची तयारी

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी; संजीवराजेंचा राजीनामा, मेळाव्याची तयारी


फलटण: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांचा प्रवेश वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच धर्तीवर, फलटणमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली घडत आहेत.

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 रोजी फलटणमध्ये खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि आमदार दिपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या समर्थकांचा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होणार आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची विधान परिषदेवर अजून चार वर्षांची मुदत बाकी आहे. त्यामुळे ते अजित पवार यांच्या गटातच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, काल झालेल्या बैठकीत श्रीमंत रामराजे यांनी संजीवराजे व त्यांच्या टीमला ठामपणे पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments