Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेश‘हजारों जवाबों से अच्छी मेरी खामोशी’, शेरो शायरीतून मनमोहन सिंग यांनी विरोधकांना...

‘हजारों जवाबों से अच्छी मेरी खामोशी’, शेरो शायरीतून मनमोहन सिंग यांनी विरोधकांना दिलं होतं उत्तर

[ad_1]

Manmohan Singh Demise :  मनमोहन सिंग हे त्यांच्या आर्थिक सुधारणांसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर त्यांच्या स्पॉट रिस्पॉन्सचे अनेक  किस्सेही प्रसिद्ध आहेत. अशीच एक घटना २७ ऑगस्ट २०१२ रोजी घडली होती. मनमोहन सिंग सरकारवर कोळसा खाण वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. कॅगच्या अहवालातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनमोहन सिंग म्हणाले की, हे आरोप निराधार आहेत. मनमोहन सिंग हे मौनी बाबा असल्याची टीका विरोधक त्यांच्यावर करत होते. विरोधकांच्या या टीकेबद्दल त्यांना पत्रकारांनी  संसद भवनाबाहेर विचारले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधिंना एक शेर ऐकवलासिंग म्हणाले,‘हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी’. हा शेर सुनावत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments