Friday, August 14, 2026
Homeसातारासातारा : सिंचनामुळे वीजनिर्मितीला फटका बसणार | पुढारी

सातारा : सिंचनामुळे वीजनिर्मितीला फटका बसणार | पुढारी

सातारा : सिंचनामुळे वीजनिर्मितीला फटका बसणार | पुढारी

[ad_1]








गणेशचंद्र पिसाळ

पाटण ः कोयना धरणातील सध्याचा शिल्लक पाणीसाठा आणि आगामी काळातील सिंचनासाठी पाण्याचे प्राधान्य लक्षात घेता त्याचा आगामी वीजनिर्मितीवर परिणाम होणार हे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर महिन्यात पश्चिम वीजनिर्मितीसाठी कमी पाणी वापरून पूर्वेकडे सिंचनासाठी अधिकचा पाणी वापर झाला आहे व सरासरी तुलनेत डिसेंबर महिन्यात वीजनिर्मितीही कमी झाली आहे. कोयनेतील पाण्याअभावी भविष्यात वीज टंचाईचा धोका लक्षात घेता शासनाने कोयना वीजनिर्मितीवर अवलंबून न राहता अतिरिक्त वीज पर्याय शोधावेत अशीच तांत्रिक आकडेवारी कोयना जलविद्युत निर्मितीमधून पाहायला मिळत आहे.

चालू तांत्रिक वर्षात कोयना धरणातील पाण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले किंवा होणार असले तरी आतापर्यंत झालेल्या सात महिन्यात याच धरणातील पाण्यावर तब्बल 1419.691 मेगॅवॅट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत जादा 8.349 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. यावर्षी पाणीटंचाई लक्षात घेता पुढच्या काळात सिंचनासाठी प्राधान्यक्रम दिल्याने कोयनेच्या पश्चिम जलविद्युत निर्मिती प्रकल्पांसाठी लवादाच्या आरक्षित पाणी कोट्यावर मर्यादा येण्याच्या दाट शक्यता आहेत. त्यामुळे आगामी पाच महिन्यांत येथे वीज निर्मितीसाठी पाणी कपात झाली तर भारनियमन अथवा अंधाराचा सामना करावा लागण्याच्या शक्यता गृहीत धरून पर्यायी विजेची व्यवस्था गरजेची आहे.

कोयना धरण तांत्रिक जलवर्षाच्या सात महिन्यांत 1419.691 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. यावर्षी आत्तापर्यंत पश्चिमेकडे जादा पाणीवापर झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 8.349 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे. धरणात यावर्षी तुलनात्मक पाऊस व पाणी आवक कमी झाली असून तांत्रिकद़ृष्ट्या भलेही सध्याचा पाणीसाठा सिंचन व वीजनिर्मितीसाठी गरजे इतका वाटत असला तरी भविष्यकाळात सिंचनाला प्राधान्यक्रम देत जादा पाणी सोडण्याची गरज भासणार असल्याने याचा वीजनिर्मितीला फटका बसणार आहे.
या तांत्रिक जलवर्षात सात महिन्यांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 29.79 टी.एम.सी. पाण्यावर 1363.043 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 29.04 टी. एम. सी. वर 1341.526 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 0.75. एम.सी. पाणीवापर ज्यादा झाल्याने 21.517 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments