Saturday, August 15, 2026
Homeसातारासातारा: पाचगणी अपघातप्रकरणी कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांचे आंदोलन मागे | पुढारी

सातारा: पाचगणी अपघातप्रकरणी कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांचे आंदोलन मागे | पुढारी

सातारा: पाचगणी अपघातप्रकरणी कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांचे आंदोलन मागे | पुढारी

[ad_1]








पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : पाचगणी – महाबळेश्वर रस्त्यावरील पॉवर हाऊस चौकात मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने दुचाकीला उडवले. यात पाचगणीतील तरुण जागीच ठार झाला होता. या प्रकरणातील संशयित ३ आरोपी पळून गेले होते. तर एकाला स्थानिक नागरिकांनी पकडले होते. दरम्यान, या आरोपींना आज (दि. ६) पाचगणी पोलीस ठाण्यात हजर केले असता नागरिकांनी मोठी गर्दी करून आरोपींना ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे येथे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवला जाणार नाही, असा हट्ट नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस ठाण्याच्या समोरील जमाव मागे हटला. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख तत्काळ पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल होत जमावाची समजूत घातली.

या अपघातामध्ये मृत झालेला तरुणाचे नाव मोहिनुद्दिन मेहराज शेख (वय 36, रा. पाचगणी) असे आहे. नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्याच्या समोरच ठेवला होता. जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह हलवला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी घेतला होता. या अपघातात अविनाश चंद्रकांत गवळी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाई येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments