Wednesday, September 30, 2026
Homeसातारासातारा : झाडाणीत 13 जणांकडून भूखंड खरेदी

सातारा : झाडाणीत 13 जणांकडून भूखंड खरेदी

[ad_1]








सातारा; पुढारी वृत्तसेवा : झाडाणी, (ता. महाबळेश्वर) येथे 13 जणांनी 500 एकर भूखंड खरेदी केला आहे. सिलिंग अ‍ॅक्टचे उल्लंघन झाल्याने तिघांकडून बेकायदा जमीन खरेदी झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. चार बांधकामे दिसून आली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना झाडाणीप्रकरणी 1 हजार पानी अहवाल सादर झाला असून, पुढील चौकशी करण्यात येणार आहे.

झाडाणी, (ता. महाबळेश्वर) येथे गुजरात येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी व त्यांचे नातेवाईक यांनी 640 एकर जमिनीचा व्यवहार करून गावच खरेदी केले आहे. त्याठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम, उत्खनन, खाणकाम करून वन्यजीव व वन कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास 10 जूनपासून उपोषण करणार असल्याचा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. वाई प्रांताधिकार्‍यांनी महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तहसीलदारांनी दिलेला अहवाल वाई प्रांताधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना सोमवारी सादर केला. या अहवालात झाडाणीप्रकरणी बर्‍याच बाबी निदर्शनास आल्या आहेत. झाडाणी येथे 13 व्यक्तींनी 500 एकर जमीन खरेदी केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

या 13 जणांपैकी 3 जणांनी नियमबाह्य जमीन खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित 3 जणांनी सिलिंग अ‍ॅक्टचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सिलिंग अ‍ॅक्टच्या कलमानुसार कारवाईचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. झाडाणी येथे रिसॉर्ट नसल्याचे महसूल यंत्रणेला दिसून आले. मात्र त्याठिकाणी 4 इमारती आहेत. त्यामध्ये 3 पक्क्या इमारती व 1 कच्ची इमारत दगडी चिर्‍यात बांधलेली आहे. या बांधकांमाचे क्षेत्रफळ सुमारे 3 हजार 500 चौरस फूट इतके आहे. या इमारतींसाठी बांधकाम परवानगी घेतली आहे किंवा कसे, याबाबत पुढील चौकशी सुरु आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उपस्थिती केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने झाडाणी प्रकरणाचा कच्चाचिट्ठा महसूल प्रशासनाने गोळा केला असून वळवींची चौकशी सुरु झाली आहे. वाई प्रांताधिकारी व महाबळेश्वर तहसिलदारांनी सादर केलेल्या 1 हजार पानी अहवालात आणखी काय काय आहे, याची उत्सुकता जिल्हावासियांना लागली आहे.

सिलिंग अ‍ॅक्टचे उल्लंघन करणारे तिघे कोण?

झाडाणीप्रकरणी कमाल जमीन धारण कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे. सिलिंग अ‍ॅक्टला हरताळ फासून जमीन खरेदी करणारे तिघे कोण आहेत? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments