Wednesday, September 30, 2026
Homeसातारासातारा : उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्‍या शुभेच्छा... | पुढारी

सातारा : उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्‍या शुभेच्छा… | पुढारी

[ad_1]








सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, असे भाजपचे खासदार उदयनराजे नेहमी उल्लेख करतात. त्याचाच प्रत्यय आज आला आहे. खासदार उदयनराजे यांनी वैरत्व विसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार उदयनराजे यांनी ट्विटच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी दूरध्वनीद्वारे त्यांना संपर्क करून त्यांचे स्वागत केले होते.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या अंतर्गत अजित पवार हे सहभागी झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले होते. लवकरच अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना भवानी तलवार आणि वाघनखे देणार असल्याचे उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments