Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशशीख धर्मीयांबद्दल मी काहीच चुकीचं बोललो नव्हतो; राहुल गांधी यांनी 'तो' व्हिडिओच...

शीख धर्मीयांबद्दल मी काहीच चुकीचं बोललो नव्हतो; राहुल गांधी यांनी ‘तो’ व्हिडिओच शेअर केला

[ad_1]

काय म्हणाले होते राहुल गांधी?

व्हर्जिनिया इथं भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भारतातील अल्पसंख्याक समुदायांसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला होता. ‘जिथं विशिष्ट धर्म, विशिष्ट भाषा आणि विशिष्ट समुदायांना गौण समजलं जाईल, असा भारत भाजपचा वैचारिक कणा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) हवा आहे, असं राहुल म्हणाले होते. ‘ही लढाई राजकारणाची नाही, राजकारण हा केवळ मुखवटा आहे. खरी लढाई विविध धर्मीयांना त्यांना श्रद्धांचं पालन करण्याचं स्वातंत्र्य असेल की नाही ही आहे. शीख बांधवांना पगडी, कडा घालून भारतातील गुरुद्वारात जाण्याची परवानगी मिळेल का, याची ही लढाई आहे, असं ते म्हणाले होते. ‘काही राज्ये इतर राज्यांपेक्षा कमी महत्त्वाची आहेत, काही भाषा इतर भाषांपेक्षा दुय्यम आहेत, काही समुदाय इतर समुदायांपेक्षा खालच्या दर्जाचे आहेत, असं आरएसएस मानतो. आमच्या दृष्टीनं सगळेच समान आहेत. सगळेच महत्त्वाचे आहेत. भारत कसा असेल यासाठीची ही लढाई आहे, असं ते म्हणाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments