
Happy Birthday Sachin Pilgaonkar: मराठी मनोरंजन विश्वाचे लाडके ‘महागुरू’ अर्थात अभिनेते सचिन पिळगावकर यांचा आज (१७ ऑगस्ट) वाढदिवस आहे. ‘नदिया के पार’ या चित्रपटातून सचिन पिळगावकर यांना खरी ओळख मिळाली होती. या चित्रपटात सचिन यांनी ‘चंदन’ या साध्याभोळ्या खेड्यातील मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून त्यांनी लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. सचिन पिळगावकर हे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या नैसर्गिक कलात्मकतेने त्यांनी लहान मुलांबरोबरच मोठ्यांच्याही हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.