
Ayodhya Ram Mandir Ramlala Idol: अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्टपणा होणार आहे. दरम्यान, मंदिरात स्थापित करण्यात येणारी रामाची मूर्ती तयार झाली असून त्याचे फोटो देखील पुढे आले आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहे. सध्या या मूर्तीची चर्चा सुरू आहे.







