Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी! वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना झटका; प्रशिक्षण तडकाफडकी...

मोठी बातमी! वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना झटका; प्रशिक्षण तडकाफडकी रद्द

मोठी बातमी! वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना झटका; प्रशिक्षण तडकाफडकी रद्द

[ad_1]

Puja Khedkar News: गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने पूजा खेडकरचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी त्यांना माघारी बोलावण्यात आले, असे महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यात शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रवर्गात स्वत:ला चुकीच्या पद्धतीने सादर करणे आणि पुण्यात पोस्टिंग दरम्यान अधिकार आणि विशेषाधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या सत्यतेची चौकशी केली जाईल, असे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments