
मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आल्यामुळे पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, कोणत्याही संमेलनास घेण्यास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संघटना यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठका आदिंना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.





