Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेश'मी पाकिस्तानी मुस्लीम असल्याने भारतात...', मुंबईत 166 जणांचा जीव घेणाऱ्या राणाचा कांगावा...

‘मी पाकिस्तानी मुस्लीम असल्याने भारतात…’, मुंबईत 166 जणांचा जीव घेणाऱ्या राणाचा कांगावा व्यर्थ; आता…

‘मी पाकिस्तानी मुस्लीम असल्याने भारतात…’, मुंबईत 166 जणांचा जीव घेणाऱ्या राणाचा कांगावा व्यर्थ; आता…

[ad_1]

Mumbai 26/11 Attack Accused: मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे प्रत्यार्पित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या हल्ल्यानंतर तहव्वूर राणाला अमेरिकी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेकदा प्रयत्न केले असून या प्रयत्नांना आता यश येणार अशी चिन्हं दिसत आहेत.

अमेरिकेमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदील दाखवला होता. मात्र आता आपलं प्रत्यार्पण होणार हे लक्षात आल्यानंतर तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. ट्रम्प यांनी प्रत्यार्पणास परवानगी दिल्यानंतर आता तहव्वूर राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून प्रत्यार्पणावर तातडीने स्थगिती मिळावी, अशी याचिका दाखल केली. मात्र ही याचिका अमेरिकी सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली आहे. त्यामुळे तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मी पाकिस्तानी मुस्लीम असल्याने…

“भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर तेथील तुरूंगात माझा छळ केला जाऊ शकतो,” अशी भिती तहव्वूर राणाने याचिकेमधून व्यक्त केली. “मी पाकिस्तानी मुस्लीम असल्यामुळे माझ्यावर अन्याय होऊ शकतो. या प्रत्यार्पणानंतर कदाचित मी मरूही शकतो. जर प्रत्यार्पणाला स्थगिती दिली गेली नाही, तर अमेरिकेचे न्यायालय आपले अधिकार क्षेत्र गमावून बसेल,” असा युक्तीवाद तहव्वूर राणाने अमेरिकी सर्वोच्च न्यायालयासमोर केला होता.  “मी पाकिस्तानी असल्याने माझ्याविरोधात शत्रूत्वाची भावना ठेवली जाईल, अशा देशात मला पाठवू नका,” अशी विनंती तहव्वूर राणाने याचिकेत केली होती.

ट्रम्प यांनी काय आश्वासन दिलं?

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी, “आम्ही अतिशय हिंसक माणूस (तहव्वुर राणा) भारताच्या ताब्यात देत आहोत. याबद्दल आमच्याकडे अनेकदा विनंत्या आल्या होत्या,” असं म्हटलं होतं. “गुन्ह्यांसंदर्भात दोन्ही देश (भारत आणि अमेरिका) समन्वयाने काम करतील. गुन्ह्यांच्या बाबतीत भारताला सहकार्य करणारे निर्णय आम्ही घेऊ,” असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेला. आता अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेण्याआधी 21 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाची याचिका फेटाळून लावली होती. तशीच याचिका तहव्वूर राणाने मोदींच्या दौऱ्यानंतर केली होती. ही याचिकाही फेटाळून लावण्यात आली आहे. 

प्रकृतीच्या कारणाचाही उल्लेख

दहशतवादी तहव्वूर राणाने आपल्या याचिकेमध्ये प्रकृती खालावल्याचेही नमूद केलं आहे. पोटाच्या विकारासहीप आपल्याला पार्किंसंस आजार असल्याचा दावा तहव्वूर राणाने केला आहे. या आजारामुळे आपण अनेक गोष्टी विसरतो. तसेच मूत्राशयाचा कर्करोग होण्याचेही संकेत मिळाले आहेत,” असं तहव्वूर राणाने याचिकेत म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments