Sunday, August 16, 2026
Homeसातारामी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही : अजित पवार

मी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही : अजित पवार

मी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही : अजित पवार

[ad_1]

Ajit Pawar PC :  खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, असं अजित पवार म्हणाले. साताऱ्यातील (Satara) पत्रकार परिषदेत बोलत होते.

30 ते 32 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काम करायचं ठरवलं : अजित पवार

अजित पवार म्हणाले की, “मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कामाची पद्धत वेगळी आहे. 30 ते 32 वर्षांपूर्वी ठरवलं आपण आपल्या महाराष्ट्रात काम करायचं. तेव्हापासून मी राज्यात काम करतोय.” “अजित पवारांवर मीडियावर कोणतीही जबाबदारी नाही, असं मीडियामध्ये जाणीवपूर्वक दाखवलं जातं. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतापदाची जबाबदारी आहे. मी नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे : सुप्रिया सुळे

दरम्यान सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अजित पवारांवर नेमकी कोणती जबाबदारी असणार?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. “अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं पद हे मुख्यमंत्री समान असतं. मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्यध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. यावरुन राज्याची जबाबदारी अजित पवारांवर असल्याचा अंदाज आहे.

संबंधित बातमी

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments