Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: 'बेताब'ची हीरॉइन आधीच निवडली गेली होती, नंतर घेतली ऑडिशन!

माझ्या हिश्श्याचे किस्से: ‘बेताब’ची हीरॉइन आधीच निवडली गेली होती, नंतर घेतली ऑडिशन!

[ad_1]

रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज मी आणखी एका सिनेमाबद्दल सांगणार आहे, जो १९८३ च्या ऑगस्टमध्ये रिलीज झाला होता. ही एक प्रेमकथा होती आणि ती खूप लोकप्रिय झाली. या सिनेमाचे संगीत आजही हिट आहे आणि त्याने फिल्म इंडस्ट्रीला दोन स्टार दिले. ते स्टार होते सनी देओल आणि अमृता सिंग. हो, तो सिनेमा होता राहुल रवैल दिग्दर्शित ‘बेताब’.

राहुलजींनी मला सांगितले होते की, धरमजींनी सनी देओलला चित्रपटसृष्टीत आणायचे ठरवले, तेव्हा त्यांनी राहुलजींना दिग्दर्शक म्हणून घेतले. सगळे जण खूप उत्साहात होते. धरमजी सुपरस्टार होते आणि त्यांचा मुलगा सनी देओलही खूप देखणा होता. सनीला घेऊन चित्रपट बनवला जात होता, त्यामुळे आता कोणती मुलगी त्याची त्याची नायिका होऊ शकते, याचा शोध सुरू झाला. सनीसाठी हीरॉइनचा शोध सुरू असल्याचे फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येकाला माहीत होते. निर्माता-दिग्दर्शक रमेश बहल यांनी राहुलजींना सांगितले की, तुम्ही जशी मुली शोधत आहात, तशी मुलगी मी दिल्लीत पाहिली आहे. राहुलजींनी त्यांना ‘कोण आहे?’ असे विचारले. रमेशजी म्हणाले की, ती रूखसाना सुल्तानाची मुलगी आहे. रूखसाना सुल्ताना तेव्हा प्रसिद्ध होत्या. त्या संजय गांधींच्या खूप जवळच्या मैत्रीण होत्या आणि आणीबाणीच्या काळात देशभर चर्चेत होत्या.

राहुलजी रमेश बहल यांना म्हणाले की, एक तर मला त्यांचा नंबर द्या किंवा भेट घालून द्या. रमेशजींनी सांगितले की, मी त्यांना शशी पांचोली यांच्यासोबत भेटलो होतो. चित्रपट निर्माता असलेले शशी पांचोली हे पांचाेली साहेबांचे पुत्र होते. असो. राहुलजीही शशी यांना ओळखत होते. त्यांनी शशीजींना फोन केला आणि आपल्याला रूखसाना सुल्तानांच्या मुलीला भेटायचे आहे, तिची भेट घालून द्या, असे सांगितले.

काही दिवसांनी शशीजी दिल्लीहून मुंबईला आले. त्यांनी सांगितले की, योगायोगाने रूखसाना आपल्या मुलीसोबत मुंबईला आल्या आहेत. मग शशीजींसोबत राहुलजी त्यांना भेटायला हॉटेलवर गेले. राहुलजींनी मला सांगितले की, त्यावेळी हॉटेलमध्ये रूखसानासोबत पत्रकार देवयानी चौबळ बसल्या होत्या. मी अमृताला भेटलो. तिला घरी सगळे ‘डिंकी’ म्हणायचे. थोडा वेळ अमृताशी बोलल्यावर मला अंदाज आला की, हीच आपल्या सिनेमाची नायिका आहे. मला अपेक्षित असलेला चेहरा, वय आणि ऊर्जा या गोष्टी तिच्यामध्ये होत्या.

राहुलजी मला सांगत होते… मग मी ही गोष्ट धरमजींना सांगितली. तिची धरमजींशी ओळख करून दिली आणि मग मी औपचारिकता म्हणून तिची ऑडिशन घेतली. खरे तर, हीच नायिका हवी, यावर सर्वांनी आधीच शिक्कामोर्तब केले होते. अशाप्रकारे या सिनेमासाठी अमृता सिंगला नायिका म्हणून साइन करण्यात आले. रूखसाना सुल्ताना यांचाही फिल्म इंडस्ट्रीशी थोडाफार संबंध होता. त्यांच्या मावशी बेगम पारा या नासीर खान (दिलीपसाहेबांचे भाऊ) यांच्या पत्नी होत्या. यावरुन मला हैरत इलाहाबादी यांचा एक शेर आठवतोय…

न तो कुछ फ़िक्र में

हासिल है न तदबीर में है,

वही होता है जो

इंसान की तक़दीर में है।

हा सिनेमा रिलीज झाला आणि सुपर-डुपर हिट ठरला, हे सर्वांनाच माहीत आहे. सनी देओलला रोमँटिक हिरो म्हणून लाँच करण्यात आले होते आणि आज तो एक ॲक्शन हिरो बनला आहे. पण मला आठवतेय, हा सिनेमा आला तेव्हा मुली सनी देओलसाठी वेड्या झाल्या होत्या.

या सिनेमाच्या अनेक किश्श्यांपैकी सगळ्यात रंजक किस्सा म्हणजे, यामध्ये सनी देओलचा एक कुत्राही होता. आणि या कुत्र्याचीही खूप महत्त्वाची भूमिका होती. राहुलजींनी मला सांगितले की, शेवटच्या अॅक्शनमध्ये हा कुत्रा मरतो, असे दृश्य आहे. सिनेमाची ट्रायल पाहून बाहेर पडणाऱ्या सर्वांनी सांगितले की, सिनेमा खूप चांगला आहे; पण शेवटी कुत्र्याचा मृत्यू होतो, त्याचं खूप वाईट वाटतं. सिनेमा रिलीज झाला तेव्हाही, शेवटी सनीचा कुत्रा मरतो, म्हणून प्रेक्षकही खूप निराशा व्हायचे. राहुलजी म्हणाले की, अशा प्रतिक्रिया मिळताच आम्ही सर्वांनी कुत्र्याला पुन्हा जिवंत करायचे ठरवले. आम्ही लगेच फिल्म सिटीमध्ये कुत्र्याला पट्टीबिट्टी बांधून अशाप्रकारे शूट केले की ते पूर्वीच्या प्रिंटशी मॅच होईल. मग ते तत्परतेने देशभरातील सर्व ठिकाणच्या प्रिंटमध्ये अॅड केले. ज्यांनी रिलीज झाल्या झाल्या पहिल्या दिवशी सिनेमा पाहिला, त्यांना कुत्र्याचा दु:खद मृत्यू बघायला मिळाला. दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर आजपर्यंत ज्यांनी हा सिनेमा पाहिला, त्यात हा कुत्रा जिवंत आहे.

‘बेताब’ हा काश्मीरवर बनलेला सिनेमा होता. काश्मीर खोऱ्यात जिथे एवढा मोठा सेट लावण्यात आला होता, त्या ठिकाणाला आजही ‘बेताब व्हॅली’ म्हणून ओळखले जाते. आज ‘बेताब’च्या आठवणीत, त्यामधील अविस्मरणीय संगीतातील हे गाणे ऐका…

जब हम जवां होंगे,

जाने कहाँ होंगे…

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments