Sunday, August 16, 2026
Homeक्रीडामथिशा पथिराणाला ‘आयपीएल’चा फायदा

मथिशा पथिराणाला ‘आयपीएल’चा फायदा

मथिशा पथिराणाला ‘आयपीएल’चा फायदा

[ad_1]

कोलंबो; वृत्तसंस्था : चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदा प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकला नाही; पण या संघातून खेळणारा श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथिशा पथिराणा याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. ‘आयपीएल’मधील त्याची कामगिरी पाहता लंका प्रीमिअर लीगमध्ये 2024 त्याच्यासाठी मोठी बोली लागली आहे.

पथिराणाला कोलंबो स्ट्रायकर्स संघाने सर्वाधिक 1.20 लाख डॉलर्स (सुमारे 1 कोटी रुपये) बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले आहे. लंका प्रीमिअर लीगच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या ऑक्शनसाठी 420 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आणि त्यात 154 लंकन खेळाडूंचा समावेश होता.

चेन्नईला यंदाच्या पर्वात साखळी सामन्यात गाशा गुंडाळावा लागला असला, तरी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील त्यांची नवी सुरुवात ही चांगली झाली. युवा गोलंदाज मथिशा पथिराणा याच्या गोलंदाजीने यंदाही प्रभावित केले. टी-20 वर्ल्डकपसाठी त्याची श्रीलंकेच्या संघातही निवड झाली आणि त्यासाठीच त्याला ‘आयपीएल 2024’ मधून लवकर मायदेशात परतावे लागले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments