Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनभारतामाता चित्रपटगृह 'या' दिवसापासून पुन्हा होणार सुरू

भारतामाता चित्रपटगृह ‘या’ दिवसापासून पुन्हा होणार सुरू

[ad_1]

भारतमाता चित्रपटगृह पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. कोरोना काळात भारतमाता चित्रपटगृह पूर्णपणे बंद पडलं. यानंतर चार वर्षानंतरही चित्रपटगृहाचे दार कधी उघडणार? याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.

आता चित्रपटगृह सुरु होण्याला दिवाळीचा मुहूर्त सापडला आहे. ‘मुक्ता ए2 सिनेमाज’च्या सहकार्याने भारतमाता चित्रपटगृहाची सुरुवात होणार आहे. 

कामे पूर्ण होण्यास 3 महिन्याचा कालावधी

भारतमाता चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. आवश्यक असलेल्या विविध परवानग्या घेतल्या जात आहेत. भारतमाता चित्रपटगृहाच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इतर कामे पूर्ण होण्यास 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती भारतमाताचे व्यवस्थापकीय भागीदार कपिल भोपटकर यांनी माध्यमांना दिली. 

भारतमाताचे वेगळेपण जपले जाणार

भारतमाता चित्रपटगृहातील प्लास्टरचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चित्रपटगृहातील खुर्च्या, लादी, रंग, एसी, ध्वनी यंत्रणा आणि इतर कामे या 3 महिन्यात होतील असे सांगण्यात येत आहे. असे असले तरी सिनेमागृहाच्या मूळ वास्तूत कोणताही मोठा बदल केला जाणार नाही.

हेरिटेज वास्तूंच्या यादीत असलेल्या भारतमाताचे वेगळेपण जपले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या जुन्या पिढीतील व्यक्तींनी भारतमाता चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहिला नसेल असे फार कमीजणच असतील. या सिनेमागृहात कामगार वर्गाची खूप मोठी गर्दी असे. भारतामाता सिनेमागृह हे अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे साक्षीदार आहे.

दादा कोंडके यांच्या सिनेमाचे पोस्टर्स नेहमी लक्ष वेधून घेत असतं. पण गेल्या काही वर्षात भारतमाता चित्रपटगृह बंद पडले. यामुळे लालबाग-परळमधील जनतेचा हिरमोड झाला होता. 


हेही वाचा

कंगनाने पाली हिलमधील बंगला 32 कोटींना विकला!

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments