Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रपोर्शे प्रकरणी बदनामी केली तर तर कोर्टात खेचेन! आमदार सुनील टिंगरेकडून शरद...

पोर्शे प्रकरणी बदनामी केली तर तर कोर्टात खेचेन! आमदार सुनील टिंगरेकडून शरद पवारांना नोटीस

पोर्शे प्रकरणी बदनामी केली तर तर कोर्टात खेचेन! आमदार सुनील टिंगरेकडून शरद पवारांना नोटीस

[ad_1]

या सभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्व महत्त्वाचे प्रश्न सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात मांडले. पण, मला एक गोष्ट सांगायची आहे जी त्यांना देखील माहिती नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही एका वेगळ्या व्यक्तीसाठी तिकीट मागितल होतं. त्या व्यक्तीला शरद पवारांच्या सहीने एबी फॉर्म मिळाला. मात्र, त्या व्यक्तिने काय केले हे सर्वांना माहिती आहे. ज्या पोर्शे करणे दोघांना चिरडले त्या मुलांच्या आई-वडिलांचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. मात्र, आरोपीला स्थानिक नेत्याने पिझ्झा खायला घातला. हे वास्तव आहे. याच्या बद्दल पवार साहेब देखील बोलले, सुषमा ताई तुम्ही बोललात. मात्र, सुषमाताई तुम्हाला माहिती नसेल की, ज्या ८० वर्षांच्या योद्ध्याने त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली. ज्यांच्यामुळे ते निवडून आले. त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे. जर त्यांची पोर्श प्रकरणी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन, असे नोटीसीत म्हटलं आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या व्यक्तीला मी आव्हान करते पोर्शे अपघातात ज्यांची हत्या झाली, त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ज्याने गुन्हा केला, त्या व्यक्तीच्या मागे तुम्ही उभे राहिला. तुमच्यात जर हिंमत असेल तर मला, रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांना देखील नोटिसा पाठवा. आम्ही कुणाला घाबरत नाही. कारण आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, असे सुळे म्हणाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments