Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रपुस्तकांच्या गावात आता मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादांची श्राव्य पुस्तके होणार उपलब्ध

पुस्तकांच्या गावात आता मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादांची श्राव्य पुस्तके होणार उपलब्ध

पुस्तकांच्या गावात आता मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादांची श्राव्य पुस्तके होणार उपलब्ध

[ad_1]

वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे साहित्याचे जाणकार आणि तज्ज्ञ वाचक यांची पुस्तक निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे पुस्तकांची निवड करण्यात येऊन विविध साहित्य प्रकारांनुसार तसेच सर्वकाळ लोकप्रिय असणारी पुस्तके या दालनांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मराठी साहित्याचे वाचक व अभ्यासक या ग्रंथदालनाचा लाभ घेऊ शकतील. पुढील काळात वेरुळ, नवेगाव बांध आणि अंकलखोप येथेही पुस्तकांचे गाव उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. लवकरच ही गावेही वाचक-पर्यटकांसाठी सुरू होतील, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments