Friday, October 2, 2026
Homeसातारापुस्तकांचे गाव भिलार देशासाठी आदर्शवत: राज्यपाल | पुढारी

पुस्तकांचे गाव भिलार देशासाठी आदर्शवत: राज्यपाल | पुढारी

[ad_1]








पाचगणी, भिलार; पुढारी वृत्तसेवा: महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि.२२) केले. भिलार गावाला राज्यपालांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल बैस म्हणाले की, पुस्तकांचे गाव भिलार पाहायला मिळाले, हे माझे भाग्य आहे. या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे, ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राज्यपाल बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकाचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयास भेट दिली.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments