Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्तानला धडकी भरवू शकतं INS Vikrant; एका दमात 14 हजार...

पाकिस्तानला धडकी भरवू शकतं INS Vikrant; एका दमात 14 हजार…

पाकिस्तानला धडकी भरवू शकतं INS Vikrant; एका दमात 14 हजार…

[ad_1]

Pahalgam Terrorist Attack : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या सर्व तुकड्या सतर्क झाल्या. सोबतच नौदल आणि वायुदलही सतर्क असल्याचं पाहायला मिळालं. शेजारी राष्ट्राच्या प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर लक्ष ठेवलं जात असतानाच भारतातील वेस्टर्न कमांड हाय अलर्टवर असल्याचं वृत्त समोर आलं. 

पहलगाम हल्ल्यानंतर नौदलाच्या वेस्टर्न कमांडसह संपूर्ण वेस्टर्न युद्धनौका ताफ्याला दक्षतेची सूचना देण्यात आली. महत्त्वाच्या युद्धनौका उच्च दर्जाच्या तयारीसह सज्ज झाल्या. पश्चिम नौदल हा नौदलाचा ‘स्वॉर्ड’ म्हणजेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा कमांड आहे. त्यामुळे पाकिस्तानशी निगडित कोणतीही तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास कमांड सर्वप्रथम दक्षतेवर असतो, त्याच धर्तीवर यावेळीसुद्धा अशाच दक्षतेच्या सूचना कमांडला देण्यात आल्या आहेत. सूचना आणि सतर्कतेच्या या वातावरणात आयएनएस विक्रांत या भारतील नौदलातील विमानवाहू जहाजानंही सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

देशातील पहिलं स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरिअर आयएनएस विक्रांतचा प्रत्येक भाग विशेष असून, त्याची विशेष ताकदही आहे. या नौदलाच्या ताफ्यातील या विमानवाहू जहाजाच्या पाच महत्त्वाच्या गोष्टींमुळं त्याला देशाचा पाठीराखा म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 

INS विक्रांतची 5 वैशिष्ट्यं… 

  • या स्वदेशी विमानवाहू जहाजावर जवळपास अडीच हजार किलोमीटर लांबीची विद्युत तार अर्थात इलेक्ट्रीक केबल लावण्यात आली आहे. ही केबल जमिनीवर पसरवल्यास ती कोच्ची ते दिल्ली इथवरचं अंतर काबीज करेल. 
  • आयएनएस विक्रांतमध्ये 14 डेक म्हणजेच 14 मजले असून, 2300 कंपार्टमेंट आहेत. या जहाजावर 1700 नौसैनिक तैनात करता येऊ शकतात. महिला अधिकारी आणि महिला अग्निवीरांगनांसाठी या विमानवाहू जहाजावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 
  • आयएनएस विक्रांतच्या स्वयंपाकघरात एका दिवसात 4800 जणांचं जेवण तयार केलं जाऊ शकतं आणि दिवसभरात 10 हजार चपात्या तयार केल्या जाऊ शकतात. 
  • अतिशय सक्षम अशा या जहाजामध्ये लहानसं रुग्णालयही असून, त्यामध्ये 16 बेडची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांत ही एक अशी युद्धनौका आहे ज्यामध्ये तेलाचे 250 टॅकर साठवून ठेवण्याचीही क्षमता असल्याचं सांगण्यात येतं. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments