Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रपलूसमध्ये झाडावर, भिंतीवर चढणारा पांढरा बेडूक आढळला

पलूसमध्ये झाडावर, भिंतीवर चढणारा पांढरा बेडूक आढळला

पलूसमध्ये झाडावर, भिंतीवर चढणारा पांढरा बेडूक आढळला

[ad_1]

सांगली : झाडावर, भिंतीवर चढू शकणारा पांढरा बेडूक कृष्णाकाठी आमणापूर (ता. पलूस) येथे आढळून आला. अतिवृष्टी होणाऱ्या भागातच बेडकाची ही प्रजाती आढळून येते. मात्र, प्रथमच कृष्णाकाठी याचे दर्शन झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वत:चा बचाव करतात. त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे याचे खाद्य असून, हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

‘कॉमन इंडियन ट्री फ्रॉग’ असे शास्त्रीय नाव असलेला हा बेडूक दुर्मीळ प्रजातीतील मानला जातो. या बेडकाला ‘झाड बेडूक’ असेही म्हणतात. आमणापूर येथील छायाचित्रकार आनंदा राडे यांना स्टुडिओमध्ये भिंतीवर पांढऱ्या रंगाचा बेडूक आढळला. याबाबत आंबोली येथील वन्यजीव अभ्यासक काका भिसे यांच्याकडून या प्रजातीची खात्री करण्यात आली, त्यांनी या बेडकाच्या प्रजातीची अधिक माहिती देताना सांगितले, स्थानिक पातळीवर दुर्मीळ असणारा पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो. तो नैसर्गिकरीत्या पांढरा असतो. राडे यांनी या बेडकाला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.

क्वचितच आढळून येणारा ‘कॉमन इंडियन ट्री फ्रॉग’ प्रजातीच्या दुर्मीळ बेडकाची प्रथम १८३० मध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो. या बेडकाला ‘चुनाम’ या नावानेही ओळखले जाते, तर संस्कृतमध्ये याला ‘चूर्ण’ असे म्हटले जाते.

जंगलात किंवा एखाद्या गावात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो. बेडकाच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात. ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात.

हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वत:चा बचाव करतात. त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे याचे खाद्य असून, हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments