परदेशात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू! कॅनडामध्ये गमावला तब्बल इतक्या मुलांनी जीव

0
16
परदेशात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू! कॅनडामध्ये गमावला तब्बल इतक्या मुलांनी जीव


indian students died in foreign countries : भारतीय मुलांचे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मुले ही परदेशात जाऊन शिक्षण घेऊन करियरच्या चांगल्या संधि निवडत आहे. पालक देखील मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यावर भर देत असतात. मात्र, पालकांची आणि भारतीय मुलांची चिंता वाढवणारी एक बातमी पुढे आली आहे. परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात परदेशात गेलेल्या तब्बल ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यात अपघात, गुन्हेगारीमुळे, नैसर्गिक मृत्यू, आदि कारणांमुळे हे मृत्यू झाल्याचे मुरलीधरन यांनी सांगितले. यात सर्वाधिक मृत्यू हे कॅनडात झाल्याचेही ते म्हणाले.



Source link