Sunday, September 20, 2026
Homeसातारापंढरपूर-कराड रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ५ महिला मजूर ठार, २ जखमी

पंढरपूर-कराड रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ५ महिला मजूर ठार, २ जखमी

[ad_1]








महूद, सांगोला : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर – कराड रस्त्यावर चिकमहुद गावाजवळ बंडगरवाडी येथे शेत काम करून घराकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या अंगावर २० चाकी मालवाहतूक ट्रक गेल्याने पाच महिला मजूर जागीच ठार झाल्या. तर दोन महिला मजूर जखमी झाल्या. या सर्व महिला कटफळ (ता. सांगोला)  येथील आहेत.  या घटनेमुळे कटफळ गावात शोककाळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की पंढरपूर कराड रस्त्यावर चिकमहुद गावाजवळ बडगरवाडी स्टॉप वर कटफळ गावातील शेतकाम करणाऱ्या महिला चिकमहुद येथील शेतकऱ्याच्या शेतीतील काम संपून कटफळ येथील घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पहात थांबल्या होत्या अचानक पंढरपूरहुन २०चाकी मालवाहतूक ट्रक क्रमाक एम एच ५० एन ४७५७हा वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेतमजुर महिला इंदुबाई बाबा इरकर वय ५० वर्षे भिमाबाई लक्ष्मण जाधव वय ४५ वर्ष कमल यल्लाप्पा बंडगर वय ४० वर्षे सुलोचना रामा भोसले वय ४५ अश्विनी शंकर सोनार वय १३ वर्षे ह्या जागीच ठार झाल्या तर मनीषा आदिनाथ पंडित वय २५ वर्षे मिनाबाई दत्तात्रय बंडगर वय ५० वर्षे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर पंढरपूर येथिल खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत,.

या सर्व महिलामजूर कटफळ येथील आहेत कटफळ गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे
मालवाहतूक ट्रक ग्रामस्थांनी पकडून ठेवला आहे









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments