Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेश'पंचायत'फेम दुर्गेश कुमार यांचा पहिला पगार किती होता? बॉलिवूडमध्ये कोणाला मानतात देव?

‘पंचायत’फेम दुर्गेश कुमार यांचा पहिला पगार किती होता? बॉलिवूडमध्ये कोणाला मानतात देव?

[ad_1]

Durgesh Kumar: झी न्यूजच्या एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमात पंचायत फेम दुर्गेश कुमार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. आपल्या संघर्षाची कहाणी सांगत नव्या पिढीला मार्गदर्शनही केले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मी इंजिनीअरिंगची तयारी करायला गेलेलो. पण भावाने मला सल्ला दिला की तुला थिएटरही करायला हवे. कारण त्यामुळे व्यक्तीमत्व विकास होतो. १९९८ मध्ये आलेल्या सत्या सिनेमात भिकू म्हात्रेचे कॅरेक्टर घरच्यांना आवडले. त्यांनी मला एनएसडी करण्याचा सल्ला दिला. आणि माझा प्रवास झाला. यात मला खूपदा अपयश आलं. पण तुम्ही अपयश सेलिब्रेट करायला शिका, तितकं तुम्ही जवळ पोहोचाल, असे दुर्गेश यावेळी म्हणाले.  

इंग्रजी येत नसेल तर

इंग्रजी तुम्हाला येतंय तर चांगली गोष्ट आहे. पण नसेल येत तरी त्याने तुमची योग्यता ठरवता येत नाही. आपण हिंद राष्ट्रात राहतो येथे तुम्हाला हिंदी यायला हवे, असे ते म्हणाले.  

पंचायतने आयुष्य बदललं?

पंचायतने आयुष्य बदललं अस तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.  मी यथार्थवादी मनूष्य आहे. ही एक जीवनशैली आहे. स्वप्न इतकंच पाहा की तुम्ही पूर्ण करु शकाल. याने तुमचं जीवन यशस्वी होईल. मी इंजिनरिंग नाही करु शकत हे मला कळलं. मग मी हिंदी साहित्याकडे गेलो, तिथून पुढे अभिनय क्षेत्रात गेलो. पंचायतनंतर मला चांगली कामं येऊ लागली. एक रुम घेतलीय. आता पाण्याची काळजी नसते. मला कुठे पोहोचायचं नाहीय. मला हा प्रवास आवडतोय. छोटंस घर आहे. मी खूप सामान्य माणूस आहे. कधी छोले भटुरे खातो, कधी दुसरं काही.. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला ऑडीशनच्या रांगेत दिसेन असेही ते म्हणाले. 

मी माझं कर्म करत राहतो

ईश्वर आहे हे मी मानतो. एक मुलगा जो काहीच करु शकत नव्हता. ज्याला समजाने नाकारलं, तो आज तुमच्यासमोर बसलाय. जे चांगल कराल ते लक्षात ठेवा. जे चुकेल त्यातून शिका. मला माहिती नव्हतं पंचायतची इतकी चर्चा होईल. लापता लेडीज ऑस्करसाठी राहीलं. मी माझं कर्म करत राहिलो, असे ते म्हणाले. 

प्रशंसादेखील डोक्यात राहते, कोणी केलेली टीकादेखील डोक्यात राहते. पण मी कशाला डोईजड व्हायला देत नाही. 

बॉलिवूडमध्ये नेपोटेझम?

तुमच्या नावापुढे ना कपूर, ना खान मग इंडस्ट्रीत कसे टिकून राहिलात? यावर ते म्हणाले, माझ्या नावापुढे कुमार आहे. मी मनोज वाजपेयींच्या मुलाखती पाहिल्या. मला काय करायचं, हे मला माहितीय. मला काम करायचंय. या इंडस्ट्रीपेक्षा बेस्ट इंडस्ट्री नाही. त्यामुळे नेपोटिझम नाहीय, असे ते म्हणाले.

पहिला पगार किती?

मला सुरुवातीचा पगार 1 हजार रुपये मिळाला. आता मला कामं मिळतात. आधीच्या तुलनेत खूप पैसे मिळतात. किती मिळतात ते सांगणार नाही, असे ते म्हणाले. 

कोणाला मानतात आयडॉल?

मनोज वाजपेयी यांना मी माझं आयडॉल मानतो.आयडॉलच नव्हे तर ते माझ्यासाठी देवच आहेत, असे ते म्हणाले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments