Tuesday, August 18, 2026
Homeमनोरंजनधुळे विश्रामगृहातील एक कोटी ८४ लाख रुपयांचे म्हणणे काय?

धुळे विश्रामगृहातील एक कोटी ८४ लाख रुपयांचे म्हणणे काय?

धुळे विश्रामगृहातील एक कोटी ८४ लाख रुपयांचे म्हणणे काय?

[ad_1]

धुळे : विधिमंडळ अंदाज समितीच्या जिल्हा दौऱ्यात निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या येथील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत सुमारे एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये आढळल्याने दौरा वादात सापडला आहे. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी संबंधित रक्कम समिती सदस्यांना देण्यासाठी जमा करण्यात आल्याचा आरोप करीत संबंधित खोलीबाहेर बुधवारी सायंकाळपासून ठिय्या दिला होता. ही खोली समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहायकाच्या नावे आरक्षित करण्यात आली आहे. खोतकर यांनी हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ अंदाज समिती बुधवारपासून धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आली. या समितीत २९ सदस्यांचा समावेश असून पहिल्या दिवशी १० सदस्य धुळे येथे दाखल झाले. समिती शासनाच्या विविध विभागांतर्फे झालेल्या कामांचा आढावा घेणार आहे. शासकीय गुलमोहर विश्रामगृहात समिती सदस्यांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. विश्रामगृहातील १०२ क्रमांकाची खोली १५ मे रोजी समितीचे अध्यक्ष खोतकर यांचे खासगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित करण्यात आली. बुधवारी सायंकाळनंतर ही खोलीच नाट्यपूर्ण घडामोडींचे केंद्रबिंदू राहिली.

माजी आमदार अनिल गोटे यांनी संबंधित खोलीत समितीला देण्यासाठी पाच कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप करीत कुलूपबंद खोलीबाहेर समर्थकांसह ठिय्या दिला. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत खोली उघडण्याची मागणी त्यांनी लावून धरली. अखेर सहा तासाच्या घडामोडीनंतर रात्री साडेअकरा वाजता अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, प्रांताधिकारी रोहन कुवर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचांसमोर खोलीचे कुलूप उघडले.

खोलीतील काही पिशव्यांमध्ये रोख रक्कम आढळली. तीन यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली असता रक्कम एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. रक्कम जप्त करुन पोलीस आणि महसूल अधिकारी निघून गेले. पहाटे चारपर्यंत ही कारवाई सुरू होती. यासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. दरम्यान, गुरुवारी समिती नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होती.

विश्रामगृहातील रोख रकमेसंदर्भात नाशिक येथील आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक (तपास) यांना कळविण्यात आले आहे. तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल. जप्त करण्यात आलेली रोकड कोषागार शाखेत ठेवण्यात येईल. प्रकरणाची चौकशी प्रगतीपथावर आहे. श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)

मला अतिशय खात्रीशीर माहिती मिळाली होती. रक्कम सापड्लायने मी केलेला आरोप सिद्ध झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे भ्रष्ट स्वरुप समोर आले. हे पैसे अंदाज समितीमधील आमदारांना दिले जाणार होते. अनिल गोटे (माजी आमदार)

अंदाज समिती आणि राज्य शासनाला बदनाम करण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी तथ्यहीन आरोप केले आहेत. रोकड आढळलेल्या खोलीत माझा स्वीय सहायक राहत नव्हता. हे विरोधकांचे षडयंत्र आहे.अर्जुन खोतकर (अध्यक्ष, विधिमंडळ समिती सदस्य)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments