Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक! मेडिकल कॉलेजच्या शिशुवॉर्डला लागली भीषण आग! १० नवजात बालकं होरपळून ठार;...

धक्कादायक! मेडिकल कॉलेजच्या शिशुवॉर्डला लागली भीषण आग! १० नवजात बालकं होरपळून ठार; १६ गंभीर जखमी

[ad_1]

Jhansi medical college fire incident : यूपीच्या झाशीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या एसएनसीयू वॉर्डला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर १६ बालकं गंभीर जखमी झाली आहेत. या विभागाचे दरवाजे आणि खिडक्या तोडून तब्बल ३७ मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेत १६ मुलं  भाजल्याची माहिती आहे. या सर्वांवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. एडीजी कानपूर आलोक सिंह यांनी दहा मुलांचा मृत्यू आणि ३७ मुलांची वाचवण्यात आल्याच्या वृत्ताला  दुजोरा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments