
तांत्रिक कारणांमुळे हे पोर्टल पाच दिवस काम करू शकणार नाही, अशी माहिती पासपोर्ट विभागाकडून देण्यात आली आहे. याचा परिणाम केवळ पासपोर्ट सेवा केंद्राच्या कामकाजावरच होणार नाही, तर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, अर्जदारांची पोलिस पडताळणी आणि परराष्ट्र मंत्रालयावरही परिणाम होणार आहे. पासपोर्टसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणाऱ्या अर्जदारांना पासपोर्ट विभागाने फार पूर्वीच माहिती पाठवली आहे.