Mumbai Boat Capsize : गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरीला प्रवाशांना घेऊन निघालेल्या नीलकमळ बोटीला नौदलाची स्पीड बोट येऊन धडकली. या दुर्घटनेत १४ जण ठार झाले. अपघात घडल्यावर अनेक जण मदतीला धावून आले. त्यांनी त्यातडीने प्रवाशांचे प्राण वाचवले. अशाच एका तरुणाने जिवाची पर्वा न करता समुद्रात पडलेल्या २५ नागरिकांचे प्राण वाचवले. आरिफ बामणे असे या तरुणांचे नाव आहे. आरिफ आहे मूळचा दापोली तालुक्यातील दाभोळ येथील रहिवासी असून त्याने केलेल्या कार्यामुळे त्यांचे कौतुक केलं जात आहे.