
Goa Paragliding Accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केरी गावात ही दुर्घटना घडली. केरी येथील डोंगराळ भागात झालेल्या अपघातात पुण्यातील शिवानी दाभाळे (वय २६) आणि पायलट सुमल नेपाळी (वय २६) यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या उत्तर भागात ही दुर्घटना घडली.





