Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशगुजरातच्या तरुणाने अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशासाठी मोजले ६० लाख रुपये; फ्रान्समध्ये रोखले विमान

गुजरातच्या तरुणाने अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशासाठी मोजले ६० लाख रुपये; फ्रान्समध्ये रोखले विमान

गुजरातच्या तरुणाने अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशासाठी मोजले ६० लाख रुपये; फ्रान्समध्ये रोखले विमान

[ad_1]

मध्य अमेरिकेतील निकारागुआ देशामार्गे यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत (United States of America) बेकायदेशीरपणे घुसखोरी करण्याकडे अनेक भारतीय तरुणांचा कल वाढत चालला असल्याचे दिसते. अशा प्रकारे अमेरिकेत बेकायदेशीर घुसखोरी करण्यासाठी दुबईहून निकारागुआ या देशाला जाण्यासाठी निघालेले, ३०३ प्रवाशीसंख्या असलेले विमान २२ डिसेंबर २०२३ रोजी तांत्रिक कारणासाठी फ्रान्सच्या व्हेट्री विमानतळावर उतरले होते. विमानतळावर फ्रान्स पोलिसांना मानव तस्करीचा संशय आल्याने सर्व प्रवाशांची तपासणी झाली होती. विमानतळावर चार दिवस तपासाअंती विमानातील सर्व प्रवाशांना भारतात परत पाठवण्यात आले होते. दरम्यान, यातील ६६ तरुण हे गुजरातमधील रहिवासी होते. या तरुणांची गुजरातच्या सीआयडीने (Gujarat Crime Investigation Department) चौकशी केली असता प्रत्येक तरुणाने अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशासाठी इमिग्रेशन एजंटला ६०-८० लाख रुपयांपर्यंत रक्कम दिल्याचे मान्य केले आहे. गुजरात सीआयडीचे पोलीस अधिक्षक (गुन्हे आणि रेल्वे) संजय खरात यांच्या नेतृत्वाखाली सध्या हा तपास सुरू आहे. हे तरुण प्रामुख्याने अहमदाबाद, गांधीनगर, आणंद आणि मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी असून यात काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे खरात यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments