कोविड-१९ च्या ५ वर्षानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा उद्रेक, आणीबाणीसदृश्य परिस्थिती

0
17
कोविड-१९ च्या ५ वर्षानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा उद्रेक, आणीबाणीसदृश्य परिस्थिती


Human Metapneumo Virus  : कोरोना महामारीची सुरुवात चीनमध्ये झाली. आता पाच वर्षांनंतर चीनमध्ये आणखी एका धोकादायक विषाणूने हाहाकार माजवला आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) असे या विषाणूचे नाव आहे. कोरोना व्हायरस इतकाच हा संसर्गजन्य आणि जीवघेणा असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही रिपोर्ट आणि सोशल मीडिया पोस्ट्सवरून असे दिसून येते की, चीनमध्येही अनेक व्हायरसचा हल्ला झाला आहे. इन्फ्लूएन्झा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-१९ विषाणू वेगाने पसरत आहेत. रुग्णालये आणि स्मशानभूमीत गर्दी दिसून येत आहे. 



Source link