Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनकोणी देशभक्तीपर सिनेमात काम केले तर कोणी नाटकात; स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कलाकारांनी...

कोणी देशभक्तीपर सिनेमात काम केले तर कोणी नाटकात; स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

[ad_1]

शिवा मालिकेतील पूर्वा कौशिक

‘शिवा’ या मालिकेत शिवाची भूमिका पूर्वा कौशिक साकारत आहे. तिने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, “सर्वांना ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताला आणखीन प्रगतीशील बनवण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे असं मला वाटत. जितकं लोक ज्ञान घेतील तितके पुढे जातील मग ते तांत्रिक ज्ञान, वाचन असो किंवा वेगळ्या प्रकारची विद्या आत्मसद करणे असो. भारतात शाळांमध्ये मला शिक्षण पद्धती आणखी सुधारलेली बघायला आवडेल. आज आपण स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलत आहोत तर मला सांगायला आवडेल की मी फ्रीडम फायटर भगत सिंग यांच्यावर एक नाटक केलं होतं. मी नवीन पिढीला हेच सांगेन की नवीन गोष्ट आत्मसाद करणं सोडू नका. कारण आताची पिढी खूप फास्ट आहे. मला तितक जास्त ज्ञान नाही पण मला असं वाटत की इतक्या विशाल लोकसंख्येमध्ये आपण नवीन गोष्टी आत्मसाद करण्यात कमी पडतोय असं वाटतंय. एक बदल बघायला आवडेल तो म्हणजे शिक्षण पद्धती मध्ये, दुसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानता आपण हे फक्त म्हणतो पण ते प्रत्यक्षात दिसत नाही. आज ही आपल्याकडे बोललं जातं की आरे तो करतोय ना, तो करणारच, तू काय करतेस, तर असं न होता दोघांना सामान नजरेने पाहिले पाहिजे” असे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments