[ad_1]
इंडिया गेट समोर केवळ टॉवेल परिधान करत डान्स केल्यामुळे सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आलेली मॉडेल सन्नती मित्रा हिने आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सन्नतीने दोन नवे व्हिडिओ शेअर करत आपलं म्हणणं मांडलं आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की, ती न्यूड नव्हती आणि तिने टॉवेलखाली कपडे घातले होते. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, हा खरंतर तिचा प्रयोग होता आणि परदेशाप्रमाणे मुलींसाठी भारत सुरक्षित आहे का, हे तिला जाणून घ्यायचं होतं.
[ad_2]
Source link
