
Shooting at New York : अमेरिकेत आणखी एक हल्ला झाला आहे. न्यूयॉर्क क्वीन्स भागात हा हल्ला झाला असून यात ११ जणांना गोळी लागल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण जखमी झाले आहेत. न्यू ऑरलियन्समध्ये शमसुद्दीन जब्बार याने नववर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष करणाऱ्या जमावावर ट्रकला धडक दिल्याने १५ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असतांना आता आणखी एकाने ११ जणांवर गोळीबार केला आहे.